Samvidhaan Hatya Diwas: केंद्र सरकारने 25 जून हा दिवस ‘संविधान हत्या दिन’ म्हणून घोषित केला आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. त्यात केंद्राने म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्यामुळे आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यासंदर्भात ट्विट केले आहे.

अमित शाह यांनी ट्विट केले की, '25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून, भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला. लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले आणि माध्यमांचा आवाज दाबला गेला. भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.’ ते पुढे म्हणतात, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश, हुकूमशाही सरकारच्या अगणित यातना आणि दडपशाहीचा सामना करूनही लोकशाहीच्या पुनरुज्जीवनासाठी लढलेल्या लाखो लोकांच्या लढ्याचा सन्मान करणे हा आहे.’ अमित शाह यांनी लिहिले, ‘संविधान हत्या दिन लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आणि प्रत्येक भारतीयामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याची अमर ज्योत जिवंत ठेवण्यासाठी कार्य करेल, जेणेकरून भविष्यात काँग्रेससारखी हुकूमशाही मानसिकता त्याची पुनरावृत्ती करू शकणार नाही.’ (हेही वाचा: Attempt To Murder Case: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल; आमदाराच्या छातीवर बसवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)