RBI's Action Against Kotak Mahindra Bank: खासगी क्षेत्रातील एक मोठी बँक समजल्या जाणाऱ्या कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका बसला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने बुधवारी कोटक महिंद्रा बँकेला तात्काळ प्रभावाने नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे थांबवण्याचे निर्देश दिले. याशिवाय, केंद्रीय बँकेने कोटक महिंद्रा बँकेवर ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यावर निर्बंध लादले आहेत. आरबीआयला कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यावर बँकेकडून उत्तरही मागवण्यात आले होते, जे आरबीआयला समाधानकारक वाटले नाही. आता 2022 आणि 2023 च्या आयटी तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.

सलग दोन वर्षे, बँकेने आयटी सुरक्षा कशी हाताळावी यावरील नियमांची पूर्तता केली नाही आणि या समस्यांचे निराकरण करण्यास सांगितल्यानंतरही, बँकेने चांगले काम केले नाही. बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, आरबीआयने कोटक महिंद्रा बँकेवर ही कारवाई केली आहे. मात्र, जे आधीच बँकेचे ग्राहक आहेत त्यांना पूर्वीप्रमाणेच सर्व सेवा मिळत राहतील. (हेही वाचा: Bank Holidays in May 2024: मे महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका; पहा संपूर्ण सुट्ट्यांची यादी)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)