आपला खरा धर्म लपवून लग्न करण्याचे खोटे आश्वासन देऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला अलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच जामीन नाकारला. न्यायमूर्ती सौरभ श्याम शमशेरी यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण नोंदवले की, आरोपीने पिडीत महिलेपासून आपला धर्म लपवून तिला प्रेमात पाडले. त्यानंतर लग्नाचे वचन देऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. अशा प्रकारे त्याने पिडीत महिलेची खूप मोठी फसवणूक केली आहे. पीडितेने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आरोपीविरुद्ध आयपीसीच्या कलम 376(2)(n), 420, 506 आणि उत्तर प्रदेश कायद्याच्या कलम 3/5 अन्वये धार्मिक धर्मांतर बंदी कायद्यानुसार एफआयआर दाखल केला होता. आरोपी हा मुस्लीम धर्माचा असून त्याने पिडीत महिलेला आपले नाव विशाल असल्याचे सांगितले होते. आता न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला आहे. (हेही वाचा: आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटर Mohsin Khan च्या भावावर 'लव्ह जिहाद’चा आरोप; खेळाडूनेही बलात्कार केल्याचा पिडीतेचा दावा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)