केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संसदेत घडलेल्या घुसखोरी प्रकरणी गंभीर चिंता व्यक्त केली आहे. घुसखोर ज्या पद्धतीने संसदेत घुसले ते पाहता ही बाब अतिशय गंभीर आहे. सरकारने संसदेच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रीत करायला हवे. जेणेकरुन अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही. दरम्यान, संसदेतील घुसखोरी प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून तपशीलाने माहिती घेतली जात आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार देशातील प्रशांनावर लक्ष वेधण्यासाठी या तरुणांनी हे कृत्य केल्याची माहिती आहे. (हेही वाचा, Derek O'Brien Suspended: राज्यसभेच्या सभापतींसोबत झालेल्या वादानंतर तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन निलंबित)

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)