राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी राम नवमीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी संदेशात म्हटले आहे:- 'राम नवमीच्या शुभ प्रसंगी मी देशातील सर्व नागरिकांचे मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो.'

'भगवान श्री राम यांचा जन्मदिन राम नवमी म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. न्याय आणि मानवी प्रतिष्ठेसाठी प्रयत्न करत असताना आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम यांच्या आदर्शांमधून मोठे बळ मिळते. भगवान श्री राम यांनी आपल्याला धर्मानुसार जीवन कसे जगावे हे शिकवले. त्यांचे संपूर्ण जीवन आणि सदाचार, सत्यनिष्ठा आणि संयम या त्यांच्या शिकवणुकीतून आपल्याला प्रेरणा मिळते. या निमित्ताने आपण भगवान राम यांची आदर्श मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी आणि एक वैभवशाली भारत घडविण्याच्या दिशेने एकत्रितपणे प्रयत्न करू या.'

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)