ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातात 288 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 1000 हून अधिक प्रवासी जखमी झाले. मदत आणि बचाव कार्य आता संपले असून रेल्वेचे झालेले नुकसान आणि अपघात घडलेल्या रेल्वे मार्गांच्या दुरुस्तीचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, विरोधी पक्ष जोरदार आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील या अपघातानंतर केंद्र सरकारवर टिका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहले आहे की,  "270 पेक्षा अधिक मृत्यूनंतरही जबाबदारी नाही, अशा वेदनादायक अपघाताची जबाबदारी घेण्यापासून मोदी सरकार पळ काढू शकत नाही. पंतप्रधानांनी तातडीने रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागावा" अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)