पंजाब पोलिसांनी (Punjab Police) खालिस्तानी समर्थक अमृतपालच्या (Amritpal Singh) आणखी पाच साथीदारांना अटक केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत एकूण 78 जणांना अटक करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग याला जल्लूपूर खेडा गावातील गुरुद्वारा साहिबला घेराव घालण्यात आला आहे. आजूबाजूला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याला कधीही अटक होऊ शकते. दरम्यान, हाय अलर्ट जाहीर करून रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत पंजाबमधील 12 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट/एसएमएस सेवा बंद (Internet Service) करण्यात आली आहे. बारा जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. अमृतपालला पोलिसांनी अटक केली मात्र तो चकमा देऊन पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या ताफ्याने त्याचा पाठलाग करून घेराव घालण्यात आला.
पहा ट्विट -
Punjab | Security enhanced across the state as searches continue to nab Khalistani sympathiser ‘Waris Punjab De’ chief Amritpal Singh who is currently on the run.
Visuals from Jalandhar- Moga Road where checking of vehicles being done by police. pic.twitter.com/DMYHeCOoa6
— ANI (@ANI) March 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)