मजदूर युनियनने आपल्या विविध मागण्यांसाठी संगरूर येथील मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे निघालेला हा मोर्चा अडवत पंजाब पोलिसांनी या मोर्चावर जोरदार लाठीमार केला. या घटनेचा व्हिडिओ एएनआय वृत्तसंस्थेने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये पोलिसांच्या लाठीमारापासून बचावर करताना लोक सैरावैरा धावताना आणि आरडाओरडा करताना दिसत आहे. पंजाब पोलिसांच्या या कृतीवरुन पंजाब सरकारवर जोरदार टीकास्त्र होत आहे.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)