आज केंद्रीय अर्थसंकल्प मांडला आहे. दरम्यान आजचा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प असल्याने सर्वसामन्यांना दिलासादायक घोषणांची अपेक्षा आहे. पण फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शिअल गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये मेट्रो शहरात 14 रूपयांनी वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलचे खाणं महाग होण्याची शक्यता आहे. तर घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र या महिन्यातही कोणतीही वाढ झालेली नाही. आजपासून मुंबई मध्ये कमर्शिअल गॅस सिलेंडर 1723.50 रूपये,  दिल्लीत रु. 1769.50 कोलकातामध्ये रु. 1887.00 आणि  चेन्नई मध्ये 1937 रुपये झाला आहे. 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)