उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी सोमवारी (27 नोव्हेंबर) महात्मा गांधींचे गेल्या शतकातील ‘महापुरुष’ असे वर्णन केले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या शतकातील ‘युगपुरुष’ म्हणून संबोधले. जैन विचारवंत आणि तत्त्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यात बोलताना घनखर म्हणाले, महात्मा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेच्या माध्यमातून आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला ज्या मार्गावर जायचे होते त्या मार्गावर नेले. (हेही वाचा: Ajay Mishra On CAA: नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचा अंतिम मसुदा 30 मार्च 2024 पर्यंत अपेक्षित- केंद्रीय मंत्री अजय मिश्रा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)