देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बेळगावी येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता जारी केला आहे. अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी 13व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते, आता त्यांची प्रतीक्षा संपली. देशभरातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे हस्तांतरित करण्यात आले. सरकारने 16 हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या किसान सन्मान संमेलनात भारत सरकारने 12 व्या हप्त्यासाठी शेवटचे पैसे जारी केले होते, तेव्हापासून अनेक शेतकरी 13व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते.
PM Modi releases 13th instalment of over Rs 16,000 crore under PM-KISAN scheme in Karnataka's Belagavi
— Press Trust of India (@PTI_News) February 27, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)