दिल्ली येथील स्वरुपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका सोसायटीमध्ये पाळीव कुत्र्याने महिलेवर हल्ला केला आहे. पीडितेने म्हटले आहे की, कुत्र्याने हल्ला केला असताना त्याच्या मालकाचेही वागणे चांगले नव्हते. काल मी सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा लक्षात आले की, सकाळी 8 च्या सुमारास त्यांच्या कुत्र्याने आमच्या घरासमोर शौच केले होते. मी त्यांच्या घरी जाऊन विचारले. त्यांना ते साफ करायला सांगितले असता. त्यांनी नकार दिला. या वेळी त्यांच्या कुत्र्याने मला चार-पाच ठिकाणी चावा घेतला. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून पुढील तपास सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, आरोपीकडे पिटबुल कुत्रा आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)