पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाहायला मिळते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बागेश्वर बाबाची रामकथा टीव्हीवरुन ऐकत आहेत. पीआयबीने या व्हिडिओची तथ्यता पडताळली आहे. पीआयबीच्या तथ्य पडताळणीत हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आणि खोटा असल्याचे पुढे आले आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ 22 जुलै 2019 चा आहे.पंतप्रधानांनी चंद्रयान-2 लॉन्च केले तेव्हा त्याचे थेट प्रक्षेपण पाहात असतानाचा हा मूळ व्हिडिओ आहे. कोणीतरी खोडसाळपणे बागेश्वर बाबाची कथा या व्हिडिओतील टीव्हीवर झळकावल्याचे पुढे येत आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)