Penetrative Sexual Assault and No Injury On Private Part: दिल्ली उच्च न्यायालयाने बलात्काराच्या प्रकरणात एक महत्वाचा निर्णय देताना असे निरीक्षण नोंदवले की, पीडितेच्या खाजगी भागावर जखमा नसणे ही बाब, पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत लैंगिक अत्याचार झालेच नाही असे मानण्याचे कारण ठरू शकत नाही. न्यायमूर्ती अमित बन्सल यांनी जून 2017 मध्ये साडेचार वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीची शिक्षा कायम ठेवताना ही टिप्पणी केली. न्यायालयाने म्हटले की, लैंगिक गुन्ह्यांमध्ये खाजगी अवयवांना दुखापत झालीच पाहिजे असे नाही. त्यामुळे केवळ दुखापती नाहीत त्यामुळे लैंगिक अत्याचार झाले नाहीत, असे मानले जाता येणार नाही. (हेही वाचा: UP Rape case: मेरठमध्ये 2 शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, आरोपी विद्यार्थी फरार)
[ #POCSO Act] Mere Absence Of Injuries On Victim’s Private Parts No Ground To Hold That Penetrative #SexualAssault Did Not Take Place: #DelhiHighCourt @nupur_0111 Reportshttps://t.co/9X5pLMaLpj
— Live Law (@LiveLawIndia) August 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)