Rahul Gandhi On Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी राहुल गांधींसह विरोधी पक्षांनी सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर राहुल गांधी यांनी सांगितले की, 'सर्वांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. विरोधकांनी सरकारला कोणतीही कारवाई करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले की, 'संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील तिथे होते. सर्व पक्षांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.' (वाचा - (हेही वाचा -Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांची माहिती देणार्यांना 20 लाखांचे बक्षीस जाहीर)
पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्यासाठी सरकारला राहुल गांधींसह विरोधी पक्षांचा पाठिंबा -
#WATCH | Delhi: After attending the all-party meeting convened by the central government, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, "Everyone condemned the #PahalgamTerroristAttack. The opposition has given full support to the government to take any action." pic.twitter.com/VOM80eiSuo
— ANI (@ANI) April 24, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)