बंगळुरूमध्ये (Bengaluru) एका व्यक्तीने व्यस्त रस्त्यावर आपल्या लहान मुलाला महिंद्रा थारचे (Mahindra Thar) स्टेअरिंग दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या निष्काळजीपणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत कार ताब्यात घेतली.

बेंगळुरूमधील एमजी रोड मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. एका व्यक्तीने व्हिडीओ रेकॉर्ड करून तो इंटरनेटवर पोस्ट केला, ज्यामध्ये एक लहान मुल एका व्यक्तीच्या मांडीवर बसून, स्टेअरिंग धरून कार पुढे सरकत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. रस्त्यावर प्रचंड रहदारी असताना हे दृश्य अतिशय धोकादायक होते.

पाहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)