भारताचे पहिले गृहमंत्री आणि स्वातंत्र्यानंतर देशातील अखंडता अबाधित ठेवण्यात मोलाचा वाटा उचलणारे सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 148 जयंती आहे. त्यांचा जन्मदिवस आता 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याची शपथ नागरिकांना दिली. स्टॅच्यू ऑफ युनिटीवर जाऊन त्यांनी पटेल यांना आदरांजलीही अर्पण केली आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी मेरा युवा भारत संघटनेचा शुभारंभ करतील. पंतप्रधानांच्या हस्ते आज केवाडियामध्ये विविध प्रकल्प आणि योजनांचा शुभारंभ आणि भूमीपूजन पार पडणार आहे.
पहा ट्वीट
#WATCH | PM @narendramodi administers 'National Unity Day' pledge to the public on the occasion of the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel at Ekta Nagar in Gujarat @PMOIndia #PMModi #SardarVallabhbhaiPatel pic.twitter.com/EZyIDAD3tD
— DD News (@DDNewslive) October 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)