पठाण हा सिनेमा दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारीत आहे. त्या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाण्याचे बोल आणि हे चित्रपटात भगव्या आणि हिरव्या रंगात चित्रित करण्यात आलेली दृश्ये वगळावीत. अन्यथा मध्य प्रदेशमध्ये चित्रपट प्रदर्शित होऊ द्यायचा किंवा नाही याबाबत आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला आहे.

अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दिपीका पादुकोन यांच्या प्रमुख भूमिका असलेला पठाण हा सिनेमा लवकरच रिलिज होणार आहे. या चित्रपटातील 'बेशरम रंग' या चित्रपटात दिपीका पादुकोन केशरी रंगाच्या बिकणीत आणि शाहरुख कान हिरव्या रंगाच्या कपड्यात दिसत आहेत. यावरुन काही संघटनांना आक्षेप आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)