चेन्नई (Chennai) आणि त्याच्या आसपासच्या जिल्ह्यांना चक्रीवादळाने मोठा तडाखा दिला आहे. गेले काही दिवस शहर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून, लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रस्ते जलमय झाले आहेत. या आपत्तीचा परिणाम सर्व प्रकारची कार्यालये, कंपन्यांवरही झाला आहे. अशात मद्रास उच्च न्यायालयाचे (Madras High Court) मुख्य न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला यांनी बुधवारी सांगितले की, दर पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे पूर येत असला तरी मुंबईतील न्यायालये एक दिवसही काम थांबवत नाहीत. शहरातील तुंबलेले रस्ते आणि वीज जोडणी विस्कळीत झाल्याने वकील किंवा पक्षकार न्यायालयात पोहोचू शकले नाहीत किंवा व्हर्च्युअल मोडद्वारे सुनावणीस उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी त्यांच्यासमोर सूचीबद्ध केलेल्या अनेक प्रकरणांमध्ये स्थगिती द्यावी लागली. यावेळी न्यायाधीशांनी मुंबईच्या न्यायालयाचे कौतुक केले.
सरन्यायाधीश म्हणाले, ‘मुंबईत पावसाळ्यात दर जुलैमध्ये पूर ही एक सामान्य गोष्ट आहे. संपूर्ण शहरात पाणी साचलेले दिसते, परंतु न्यायालयाचे कर्मचारी पोहोचू शकत नसले तरी न्यायालये एक दिवसही काम थांबवत नाहीत.’ चक्रीवादळामुळे चेन्नईत 4 डिसेंबरला मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर आणि भागात पाणी साचले आहे. संपूर्ण शहरात वीज आणि पाणी कनेक्शन आणि सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. (हेही वाचा: Michaung Cyclone: मिचौंग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा)
Mumbai courts don’t stop work even for a day despite floods every monsoon: Madras High Court Chief Justice SV Gangapurwala
Read story here: https://t.co/sCeTvCNRP7 pic.twitter.com/D2AgBkIbm3
— Bar & Bench (@barandbench) December 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)