Lightning Safety Tips: पावसाळ्यात कडाडणार्या वीजांबददल काही मिथकं आणि सत्य यांच्याबद्दल भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून खुलासा; पहा कसे रहाल सुरक्षित?
भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून पावसाळ्याच्या दिवसामध्ये वीजेच्या कडकडाटापासून सुरक्षित कसे रहावं याची माहिती जारी केली आहे.
महाराष्ट्रात सध्या पावसाचं आगमन झालं आहे. सर्वदूर मान्सून पूर्व सरींमध्येही वीजांचा कडकडाट पहायला मिळत आहे. काही ठिकाणी वीजा कोसळल्याने लोकांचा मृत्यू झाला आहे. या वीज कोसळण्याच्या घटनांमुळे त्याबद्दल काही समज-गैर समज निर्माण झालेले आहेत. त्यावर आता भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कडून खुलासा करत नागरिकांनी वीज कोसळत असताना नेमकं काय करावं ज्यामुळे ते सुरक्षित राहू शकतात याची माहिती जारी केली आहे. यामध्ये नागरिकांना सुरक्षित कसं रहावं यासाठी काय कराल आणि काय टाळाल? याची माहिती देण्यात आली आहे. Maharashtra Rain Update on 28 May: महाराष्ट्रात आजही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता; तीन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी, जाणून घ्या आजचे हवामान.
वीजांच्या कडकडाटात कसं रहाल सुरक्षित?
विजेच्या आपत्तीपासून हानी टाळण्यासाठी ही तथ्ये माहित असणे गरजेचे आहे!
भारतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी हा व्हिडिओ जारी केला आहे. pic.twitter.com/9A80w2YjLx
— Subhash Shelke - सुभाष शेळके (@suvishelke) May 27, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 28, 2025 10:46 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

