भारत सरकारने देशातील साखरेची किरकोळ किंमत यशस्वीपणे कायम राखली आहे. आता साखर बाजारातील साठेबाजीला आणि बेईमान सट्टेबाजीला आळा घालण्यासाठी एक सक्रिय उपाय म्हणून सरकारने, व्यापारी/घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, बिग चेन किरकोळ विक्रेते, साखरेचे प्रोसेसर यांच्यासाठी प्रत्येक सोमवारी अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या पोर्टलवर (https://esugar.nic.in) साखरेचा साठा जाहिर करण्याचे आदेश जारी केले आहेत. याद्वारे सर्व ग्राहकांना परवडणाऱ्या दरात साखर उपलब्ध आहे हे सुनिश्चित करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच यामुळे नियामक प्राधिकरणांना स्टॉक पातळीचे बारकाईने निरीक्षण करण्यास आणि बाजारातील कोणत्याही संभाव्य फसवणुकीविरूद्ध त्वरित कारवाई करण्यास मदत होईल. अशा प्रकारे वर्षभर घरगुती ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. (हेही वाचा: Flipkart Big Billion Days Sale 2023: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल; आयफोन स्वस्तात, इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 80% पर्यंत मिळणार सवलत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)