मिझोरम विधानसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस खासदार शशी थरूर राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शनिवारी एका निवडणूक रॅलीत शशी थरूर आयझॉलमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत मिझो गाण्यावर नाचताना दिसले. काँग्रेस खासदार शशी थरूर हे पक्षाच्या नेत्यांसोबत डान्स करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. विधानसभेच्या 40 जागा असलेल्या मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)