लखमीपुर खेरी हिंसाचार प्रकरणी आज राज्यातील महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे दुकानांसह बस सेवा नागरिकांसाठी बंद असण्याची शक्यता आहे. परंतु अत्यावश्यक सेवा या सुरु राहतील. याच पार्श्वभुमावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आजच्या बंदच्या हाकेवरुन महाविकास आघाडी सरकारवर ट्विट करत टीका केली आहे.
Tweet:
बंद आणि बंद..बंद करा हे बंद..!
ज्यांनी मुंबईला बंद करुन आपले दुकान चालवले त्या तथाकथित"बंदसम्राटांचा" पुन्हा आज इतिहास आठवा...
मुंबईतील गिरणी बंदला छुपा पाठींबा देऊन कामगारांना उध्वस्त केले
युनियनच्या नावाने कारखाने बंद करुन कष्टकरी,श्रमिकांना देशोधडीला लावले
1/3
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 11, 2021
Tweet:
एवढेच कशाला आता, सत्तेत आल्यावर मेट्रो कारशेडचे काम बंद करुन मुंबईकरांना वेठीस धरलेय..
कोस्टल रोडला विरोध...नवी मुंबई, चिपी विमानतळाला विरोध, समृद्धी महामार्गला विरोध..
मेट्रोचेही हे विरोधकच..
हे तर विकासातील गतीरोधक!
बंद आणि विरोध यांचा "धंदा"
गोळा होतो त्यावरच "चंदा"!
2/3
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 11, 2021
Tweet:
आई जगदंबेच्या नवरात्रीत महाराष्ट्र बंद
ही तर तिघाडीतील तीन पक्षांची "महिषासुरी"चाल
आई दुर्गामाते जनतेला दे “बळ”!
उधळून टाकील जनता या महिषासुरांचा हा “खेळ”!
3/3
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 11, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)