मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर येथे रविवारी एका स्कूल बसला आग लागली. या आगीत ही शालेय बस जळून खाक झाली. वाहनातील विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे वृत्तसंस्था एएनआयने आपल्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, प्राप्त माहितीनुसार, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले तोपर्यंत बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती. (हेही वाचा, Uttar Pradesh Accident: बरेली-नैनिताल महामार्गावर भरधाव कारची ट्रकला धडक लागल्याने भीषण आग,घटनेत ८ जणांचा मृत्यू)
व्हिडिओ
#WATCH | Madhya Pradesh: Several students and teachers were forced to rush off a school bus after it burst into flames in Jabalpur. Fire tender present at the spot. pic.twitter.com/UuSSCmN63B
— ANI (@ANI) December 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)