लखनऊ येथील एका व्यक्तीला मंगळवारी सकाळी अटक करण्यात आली. त्याच्यावर त्याच्या तीन महिन्यांच्या मुलीच्या कथित हत्येचा आरोप आहे. मद्यधुंद अवस्थेत पत्नीसोबत झालेल्या जोरदार भांडणानंतर त्याने हे कृत्य केल्याची माहती आहे. पारा पोलीस स्टेशनने घटनेची दखल घेत आरोपीला घटनास्थळावरुन अटक केले आहे. सौरभ गौतम असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 304 आणि 323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरोधात त्याची पत्नी ममता (वय -२४) यांनी तक्रार दिली होती. पारा येथील हरदोई नगर मोहन रोड येथील खुशाल गंज परिसरात हे जोडपे राहत होते. किरकोळ भांडणातून आरोपीने हे कृत्य केले. सध्या त्याची चौकशी सुरु आहे.

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)