Lok Sabha Elections 2024 Results: सध्या संपूर्ण देशाचे लक्ष उद्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावर लागले आहे. एकीकडे एक्झिट पोलमध्ये पीएम मोदी तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक करताना दिसत आहेत, तर दुसरीकडे इंडिया आघाडीदेखील त्यांच्या विजयाबाबत आशावादी आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्याच्या दाव्यांच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया’ आघाडी अलर्ट मोडमध्ये आली आहे. कार्यकर्त्यांना मतमोजणीवर बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इंडिया आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसने उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत दिल्लीत राहण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. अपेक्षेनुसार आणि मूल्यांकनानुसार जागांची संख्या आली नाही किंवा अपेक्षेप्रमाणे निकाल न आल्यास, प्रदर्शन/पत्रकार परिषद/राष्ट्रपतींची भेट यासह अन्य पर्यायांवर चर्चा केली जाईल, जिथे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. काँग्रेसच्या सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. (हेही वाचा: CM Kejriwal On Exit Polls: 'एक्झिट पोल खोटे, ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता! तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांनी व्यक्त केली भीती)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)