Lok Sabha Elections 2024 Result: लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू येऊ लागले आहेत. यावेळी एनडीए पुढे आहे. मात्र, इंडिया आघाडीही पूर्वीपेक्षा चांगल्या स्थितीत आहे. एनडीए 299 जागांवर पुढे आहे. यामध्ये जेडीयूच्या 14 जागांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यात जेडीयूची महत्त्वाची भूमिका आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, इंडिया अलायन्सने नितीश कुमार यांना उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. बहुमताचा 272 चा आकडा गाठण्यासाठी एनडीएला नितीश कुमार यांच्या महत्त्वाच्या पाठिंब्याची गरज आहे. दुसरीकडे केंद्रातील मोदी सरकारला उखडून काढण्यासाठी विरोधक रणनीती आखण्यात गुंतले आहेत. यासाठी नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू एका महत्त्वाचा पक्ष मानला जात आहे. नितीश यांच्या पुढाकाराने इंडिया आघाडीची स्थापना झाली होती, मात्र नंतर त्यांनी एनडीएशी हातमिळवणी केली. आता नितीश यांना इंडिया आघाडीमध्ये परत आणून मोदी आणि भाजपला केंद्रातील सत्तेवरून हटवण्याची रणनीती आखली जात आहे. नितीश कुमार यांना इंडिया आघाडीने उपपंतप्रधानपदाची ऑफर दिली आहे. (हेही वाचा: Lok Sabha Election Results 2024: राममंदिर असलेल्या फैजाबाद मतदारसंघात भाजप पिछाडीवर)
पहा पोस्ट-
I.N.D.I.A's 'Deputy PM' post for Nitish Kumar: SOURCES pic.twitter.com/KhbJixSOGw
— TIMES NOW (@TimesNow) June 4, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)