पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला ( Sidhu Moosewala) यांच्या हत्तेचा मास्टरमांड असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला ( Lawrence Bishnoi) आज सकाळी अमृतसर (Amritsar) कोर्टात हजर करण्यात आले. लॉरेन्सवर पन्नापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.  राणा कांदोवालिया हत्येप्रकरणी ( Rana Kandolia Murder Case) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला अमृतसर कोर्टाकडून 5 दिवसांची पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅगमध्ये 600 पेक्षा अधिक शार्प शूटरचा समावेश असुन त्याच्या या टोळीचं जाळ पंजाब (Punjab) , हरियाणा (Haryana) , दिल्ली (Delhi), उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) , राजस्थान (Rajasthan) , मध्य प्रदेश (Madhya Pradesh) , महाराष्ट्र (Maharashtra) अशा विविध राज्यांमध्ये पसरलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)