कर्नाटकमधील हसन येथून प्रेयसीच्या हत्येचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या ठिकाणी प्रियकराने भांडणानंतर चाकूने गळा चिरून प्रेयसीची हत्या केली आहे. शुक्रवारी 23 वर्षीय आरोपी तरुणाला अटक करण्यात आली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. तेजस असे आरोपीचे नाव असून, त्याचे सहा महिन्यांहून अधिक काळ या मुलीससोबत संबंध होते. ही मुलगी संगणक विज्ञान अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती. आरोपीही त्याच महाविद्यालयातून पदवीधर झाला असून तो तिचा सिनिअर होता. अहवालानुसार, दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. अलीकडेच तेजसला मुलीच्या पूर्वीच्या नात्याबद्दल माहिती मिळाली, ज्यामुळे त्यांच्यात भांडण झाले. मुलीने आपल्यापासून ही गोष्ट लपवली याचा तेजसला राग आला होता. या वादानंतर मुलीने आपल्याला हे नाते तोडायचे असल्याचे सांगितले. त्यानंतर तेजसने तिला चर्चेसाठी भेटायला बोलावले. तो तिला शहरापासून सुमारे 13 किमी अंतरावर एका टेकडीकडे घेऊन गेला. तेथे दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले आणि त्यानंतर त्याने चाकू काढला आणि तिचा गळा चिरला. घटनेनंतर काही वेळातच त्याने तिला तसेच सोडून दुचाकीवरून पळ काढला. परिसरातील काही लोकांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले जेथे तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तेजसला या घटनेसंदर्भात अटक करण्यात आली आहे. (हेही वाचा: Punjab Shocker: पंजाब पोलिस उपनिरिक्षकाचा सापडला मृतदेह, पूर्ववैमन्स्यातून हत्या केल्याचा संशय,चौकशी सुरु)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)