कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातील एका 35 वर्षीय व्यक्तीचा चेलुवांबा हॉस्पिटलच्या बाहेर झोपेतच मृत्यू झाला. हॉस्पिटलच्या वसतिगृहासाठी भरण्यासाठी 30 रुपये शुल्क परवडत नसल्यामुळे ही व्यक्ती रुग्णालयाच्या बाहेरच झोपली होती. द न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, शिवगोपालय्या असे या व्यक्तीचे नाव आहे. शुक्रवारी ते पत्नी अश्वथम्मा यांच्यासोबत म्हैसूरला रुग्णालयात गेले होते, जिथे त्यांच्या पत्नीने मुलाला जन्म दिला होता. पत्नी आणि नवजात मुलगा हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये होते. अशात आर्थिक अडचणींचा सामना करत असलेल्या शिवगोपालय्या यांना सलग तीन रात्री हॉस्पिटलच्या अंगणात झोपावे लागले. डॉक्टरांना कोणत्याही क्षणी आपली गरज भासेल या भीतीने ते कडाक्याच्या थंडीत रुग्णालयाच्या बाहेरच झोपत होते. सोमवारी सकाळी त्यांचा मृतदेह रुग्णालयाच्या प्रांगणात आढळून आला. रुग्णालयातील ऐका व्यक्तीने सांगितले की, शिवगोपालय्या यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नव्हते. एका डॉक्टरने बाळासाठी दुधाची पावडर विकत घेण्यासाठी पैसे दिले होते. (हेही वाचा: AB PM-JAY Senior Citizen Scheme अंतर्गत 5 लाखांची मदत नाकारल्याने कॅन्सरग्रस्त 72 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करत संपवलं जीवन)
व्यक्तीचा कडाक्याच्या थंडीत रुग्णालयाच्या प्रांगणात मृत्यू -
#Karnataka man dies in hospital courtyard due to cold, unable to afford ₹30 dormitory fee: Reporthttps://t.co/QBKVlHOa29
— Hindustan Times (@htTweets) January 14, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)