Instagram Reels Obsession: कर्नाटकातील चामराजनगर येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. इथे पत्नीच्या इन्स्टाग्राम रील्सला कंटाळलेल्या एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या इन्स्टाग्राम रील्स बनवण्याच्या छंदामुळे पती नाराज होता, त्यामुळे त्याने हनुरू परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, पोर्टर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला त्याची पत्नी इंस्टाग्राम रील्स बनवणे पसंत करत नव्हते.

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, पती आपल्या पत्नीच्या सोशल मीडिया अकाउंटवर नाराज होता. पतीने यावर अनेकदा आक्षेप घेतला. मात्र पत्नीने याकडे लक्ष दिले नाही. तरीही ती सोशल मीडियावर सतत सक्रिय होती. या कारणावरून या जोडप्यात वारंवार वाद होत होते आणि जेव्हा प्रकरण टोकाला पोहोचले तेव्हा त्या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. (हेही वाचा: Cyber Attacks in 2023: भारतात सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ; वेबसाइट्स आणि ॲप्सवर आतापर्यंत 5.14 अब्ज पेक्षा जास्त सायबर हल्ले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)