कर्नाटकात सध्या काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहे. तर भारतीय जनता पार्टी 64 जागांवर आघाडीवर आहे. जेडीएस पक्षाला 18 जागांवर आघाडी मिळाली आहे. कर्नाटकमधल्या मतदारांनी भाजपाऐवजी काँग्रेसच्या झोळीत मतं टाकून काँग्रेसवर विश्वास दर्शवला आहे.दिग्गज बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील या निकालावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.स्वाभिमानी कन्नडिगांना सलाम, ज्यांनी द्वेष पसरवणाऱ्या ढोंगी, नग्न सम्राटाला सत्तेपासून दूर केलं. असे ट्विट प्रकाश राज यांनी केलं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)