Karnataka Election Result 2023: कर्नाटकच्या निकालानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंचा राजीनामा, उद्या काँग्रेस करणार सत्तास्थापनेचा दावा
दरम्यान भाजपच्या पराभवानंतर बोम्मई यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली होती.
कर्नाटकचे (Karnataka) मुख्यमंत्री आणि भाजप नेते बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai ) यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करण्यासाठी राजभवन गाठले. 136 जागांसह काँग्रेस मोठ्या विजयाकडे वाटचाल करत असल्याची माहिती आहे. कर्नाटकचे राज्यपाल थावर चंद गहलोत (Thawar Chand Gehlot) यांना त्यांनी आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपावला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार उद्याच काँग्रेस सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. दरम्यान भाजपच्या पराभवानंतर बोम्मई यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली होती.
पहा ट्विट -
Karnataka CM and BJP leader Basavaraj Bommai tendered his resignation to Governor Thawar Chand Gehlot following BJP's defeat in #KarnatakaElection pic.twitter.com/cFI2EmgxKh
— ANI (@ANI) May 13, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 13, 2023 10:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

