देशातील आघाडीच्या आयटी कंपनीपैकी एक असलेल्या इन्फोसिसने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीत इन्फोसिसचा एकात्मिक निव्वळ नफा वार्षिक 7.8 टक्क्यांनी वाढून 6,128 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीने शेअर बाजाराला माहिती दिली की, मार्च तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 16 टक्क्यांनी वाढून 37,441 कोटी रुपये झाले आहे. इन्फोसिसने 2023-24 या आर्थिक वर्षात महसुलात 4 ते 7 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
Infosys March quarter consolidated net profit rises 7.8 pc year-on-year to Rs 6,128 crore: Regulatory filing
— Press Trust of India (@PTI_News) April 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)