गुरुवारी, रामनवमीच्या मुहूर्तावर, मध्य प्रदेशातील इंदूरच्या बेलेश्वर महादेव मंदिरात एक मोठी दुर्घटना घडली. आज इथे विहिरीवर बनवण्यात आलेल्या छतावर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने छत कोसळले व अनेकजण विहिरीत पडले. या अपघातात दोन महिलांसह 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी सांगितले की, एकूण 19 लोकांना जिवंतपणे बाहेर काढण्यात आले. मात्र त्यातील एकाची प्रकृती गंभीर होती. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. काही लोक अजूनही विहिरीत अडकले असून बचावकार्य सुरू आहे. अधिकृत सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मृतांचा आकडा वाढू शकतो. मात्र, बचावकार्य संपल्यानंतरच याची पुष्टी होऊ शकते. ज्या ठिकाणी विहीर आहे ती जागा अरुंद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे बचावकार्यात अधिकाऱ्यांना अडथळे आले. विहिरीत अडकलेल्या लोकांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)