भारतीय वस्तू आणि सेवांच्या निर्यातीने (Goods and Services Exports) प्रथमच USD 750 अब्जचा टप्पा ओलांडला आहे. एएनआयने ही बातमी दिली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंगळवारी एका कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. याआधी 2021-22 मध्ये, देशाच्या वस्तू आणि सेवांच्या निर्यातीने अनुक्रमे USD 422 अब्ज आणि USD 254 अब्ज इतका उच्चांक गाठला, ज्यामुळे एकूण शिपमेंट USD 676 अब्ज झाली.

गोयल यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘सेवांमध्ये निश्चितच वेगवान वाढ आहे, परंतु दोन्ही (व्यापारी वस्तू आणि सेवा निर्यात) मध्ये वाढ चांगली आहे. या वर्षाच्या शेवटी सुमारे USD 760 अब्ज निर्यात अपेक्षित आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)