भारतीय आणि यूएस सैन्याने अलास्का येथे एक सहयोगी सामरिक सराव केला. हा सराव म्हणजे सध्या सुरु असलेल्या एका युद्ध अभ्यासाचा भाग आहे. भारतीय लष्कराच्या अधिकार्यांनी सांगितले की, दोन्ही सैन्यांनी अलास्कामध्ये फील्ड प्रशिक्षण कवायतीत सक्रीय सहभाग नोंदवला. भारतीय सैन्य दल नुकतेच या प्रदेशात दाखल झाले आहे.
वृत्तसंस्था एएनआयने याबाबत दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या सरावाचा उद्देश सर्वोत्कृष्ट सरावांची देवाणघेवाण सुलभ करणे, आंतरकार्यक्षमता वाढवणे आणि भारतीय आणि यूएस सैन्यांमधील संबंध मजबूत करणे हा आहे. हा सराव 25 सप्टेंबर पासून सुरु झाला असून तो 8 ऑक्टोबर पर्यंत फोर्ट वेनराईट, अलास्का, यूएस येथे सुरु राहणार आहे.
व्हिडिओ
VIDEO | Indian and US armies conduct collaborative tactical exercise in Alaska as part of ongoing exercise 'Yudh Abhyas'.
(Source: Third Party) pic.twitter.com/gw6uKXab5J
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)