विरोधी पक्ष इंडिया आघाडीची (INDIA BLOC) चौथी बैठक पुन्हा पुढे ढकलण्यात आली असून ती 19 डिसेंबर रोजी दिल्लीत होणार असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी रविवारी सांगितले. 17 डिसेंबरपासून होणारी बैठक का पुढे ढकलण्यात आली याचे कोणतेही कारण त्यांनी दिले नाही. तत्पूर्वी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेत्यांनी निर्णय घेतल्यानंतर ही बैठक 17 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)