अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सांगितले की, त्यांचे सरकार मागील संयुक्त पुरोगामी आघाडी (UPA) सरकारचे 'पाप' धुवत आहे, कारण ते भविष्यात हस्तांतरित केलेल्या इंधन सबसिडीची परतफेड करत आहेत. राज्यसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, तेलाच्या किमती न वाढवल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या बदल्यात यूपीए सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना तेल बॉण्ड्स जारी केले होते. हे रोखे भविष्यातील सरकारांद्वारे द्यायचे अनुदान होते. 'एनपीए' संदर्भात त्या म्हणाल्या, 10.09 लाख कोटी रुपयांची कर्जे गेल्या पाच वर्षांत बँकांनी राइट ऑफ केली आहेत आणि ती वेव्ह ऑफ केली गेली नाहीत. म्हणजेच कर्जदार कर्जासाठी जबाबदार असतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)