मणिपूरमध्ये (Manipur) गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारात (Violance) शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मोठ्या संख्येने लोकांना घरे सोडावी लागली आहेत. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या संदर्भात विरोधी पक्ष सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत आणि मणिपूरबाबत सरकारकडे जाब विचारत आहेत. मात्र सरकार विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देत नाही. अशा परिस्थितीत भारताच्या विरोधी आघाडीचे खासदार आज मणिपूरला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. हे खासदार मणिपूरला पोहोचून तेथील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पीडितांची भेट घेणार आहेत.

पहा फोटो  -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)