Husband, Wife, Anal Sex and HC: उत्तराखंड उच्च न्यायालयाने अलीकडेच एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटले आहे की, जर पती-पत्नीमधील लैंगिक कृत्य आयपीसीच्या कलम 375 च्या अपवाद 2 नुसार दंडनीय नसेल, तर पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याबद्दल कलम 377 अंतर्गत पतीला दोषी ठरवता येत नाही. खंडपीठाने म्हटले आहे की, भारतीय दंड संहितेच्या कलम 375 मधील अपवाद 2 मध्ये असे नमूद केले आहे की, पुरुष आणि त्याची पत्नी यांच्यातील लैंगिक कृत्ये ही बलात्कार नाहीत, याचा प्रभावी अर्थ असा आहे की विवाहित जोडप्यामध्ये शारीरिक संबंधांसाठी संमती आहे. ‘गुदमैथुन’ हे कृत्य देखील भारतीय दंड संहितेच्या कलम 375 अंतर्गत येते आणि त्यातील अपवाद 2 नुसार, अशा कृत्यासाठी पतीला भारतीय दंड संहितेच्या कलम 375 अंतर्गत दोषी ठरवता येत नाही. अशा स्थितीत भारतीय दंड संहितेच्या कलम 377 मधील तरतुदी पतीविरुद्ध लागू होऊ शकत नाहीत.

पत्नीने तिच्या पतीविरुद्ध एफआयआर दाखल केला होता आणि आरोप केला होता की, त्याने तिला वारंवार अनैसर्गिक सेक्स करण्यास भाग पाडले, ज्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. याशिवाय पतीवर लहान मुलासमोर अश्लील कृत्य करून पत्नीला शारीरिक इजा केल्याचाही आरोप होता. (हेही वाचा: HC on Visiting Child Porn Website: चाईल्ड पोर्नोग्राफी पाहणे गुन्हाच; कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेशात फेरबदल)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)