HRA Claims: अलीकडेच आयकर परतावा भरतेवेळी खोटे घरभाडे भत्ता (HRA) दावा करणाऱ्या प्रकरणांबाबत काही अहवाल समोर आले होते. ज्यामध्ये दावा करण्यात आला होता की, देशात एचआरएचा दावा करण्यासाठी अनेक चुकीच्या पद्धती वापरल्या जात आहेत व सीबीडीटीला अशा प्रकरणांची माहिती मिळाली आहे. अहवालात पुढे असेही नमूद केले होते की, सीबीडीटी अशी प्रकरणे पुन्हा उघडणार आहे, म्हणजेच त्यांची पुन्हा तपासणी होणार आहे. आता सीबीडीटीने या प्रकरणी स्पष्टीकरण दिले असून, सध्या अशी कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. अशा प्रकरणांबाबत विशेष मोहीम राबविली जात नसल्याची माहिती आयकर विभागाने करदात्यांना दिली आहे. विभाग करदात्यांना अशा चुका सुधारण्याची संधी देत ​​आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमध्ये येत असलेल्या अशा बातम्या चुकीच्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. सीबीडीटीनुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अनेक प्रकरणांमध्ये, भरलेले भाडे आणि दिलेली पावती यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले होते. (हेही वाचा: 30 Indian Startups Raised Over $172 Million: 30 भारतीय स्टार्टअप्सनी $172 दशलक्षपेक्षा जास्त उभारला निधी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)