Hindu Wedding Without Rituals: अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने हिंदू विवाहाशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करताना, एक महत्वाची टिपण्णी केली. न्यायालयाने म्हटले आहे की, हिंदू व्यक्तीच्या लग्नात हिंदू रितीरिवाजांचे पालन करणे आवश्यक आहे, जर असे केले नाही तर रजिस्ट्रारने जारी केलेले विवाह प्रमाणपत्र किंवा आर्य समाज मंदिराने जारी केलेल्या प्रमाणपत्राला महत्त्व नाही. हा निर्णय देत, न्यायमूर्ती राजन राय आणि न्यायमूर्ती ओम प्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठाने, 39 वर्षीय कथित धार्मिक नेत्याचा 18 वर्षीय मुलीशी फसवणूक करून केलेला विवाह रद्दबातल ठरवला आहे. आपल्या अपीलमध्ये मुलीने लखनौच्या कौटुंबिक न्यायालयाच्या 29 ऑगस्ट 2023 च्या निर्णयाला आव्हान दिले होते. मुलीचा कथित विवाह 5 जुलै 2009 रोजी झाला होता. तिने कौटुंबिक न्यायालयात हिंदू विवाह कायद्याच्या कलम 12 अंतर्गत दावा दाखल करून विवाह रद्द ठरवण्याची मागणी केली होती. मात्र कौटुंबिक न्यायालयाने मुलीचा खटला फेटाळला होता. (हेही वाचा: Driving Rule: अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास पालकांना होणार शिक्षा; 25,000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद, पोलिसांनी दिला इशारा)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)