हिमाचल प्रदेशातील सिमला येथे एका भोजनालयात अचानक स्फोट झाला. स्फोटाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. स्फोटामुळे एकच खळबळ उडाली. स्फोटाचे नेमके कारण समजू शकले नाही. स्थानिक डीजीपी संजय कुंडू यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, असे जाणवत आहे. कारण हे एक पर्यटण स्थळ आहे. इथे दिवसभरात असंख्य लोक भेट देतात. त्यामुळे या स्फोटाचा बारकाईने तपास केला जाईल. या तपासात फॉरेन्सिक तज्ञ देखील असतील. त्यामुळे जेणेकरून आम्ही याच्या तळापर्यंत जाऊ शकू. इथे बरीच भोजनालये आणि हॉटेल्स आहेत. गॅस, इलेक्ट्रिक सप्लाय आणि रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसर संबंधीत आम्ही संबंधित प्राधिकरणाला हे देखील तपासण्यासाठी सांगू, असेही कुंडू यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)