हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या विधानसभा निवडणुका 2022 चे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरुवारी, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. हिमाचल प्रदेशातील 68 जागांवर सुमारे 66 टक्के मतदान झाले. एक्झिट पोलनुसार, हिमाचल प्रदेशात भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत पाहायला मिळत आहे. चार एजन्सींच्या सर्वेक्षणात भाजप 32 ते 40 च्या दरम्यान म्हणजेच बहुमताच्या जवळ दिसत असला तरी, काँग्रेसचा आकडाही बहुमताला स्पर्श करताना दिसत आहे. चारही सर्वेक्षणांमध्ये काँग्रेसला 27 ते 34 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच भाजप आणि काँग्रेस यांच्यात जवळपास बरोबरी आहे.
हे निकाल समोर आल्यानंतर कॉंग्रेसच्या सोशल मीडिया चेअरपर्सन आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स सुप्रिया श्रीनेत यांनी यावर भाष्य केले आहे. त्या म्हणतात, 'हिमाचल प्रदेशमध्ये आम्ही लोकांचे प्रश्न, लोकांचे मुद्दे उचलून धरले आणि तेच क्लिक झाले. दरम्यान, गेल्या 2017 च्या हिमाचल विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकूण 68 पैकी 44 जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी काँग्रेसला 21 जागा आणि माकपला एक जागा मिळाली.
कांग्रेस प्रवक्ता @SupriyaShrinate ने हिमाचाल प्रदेश के Exit Poll पर कहा, हमने लोगों के मुद्दे उठाए वो क्लिक किया #HimachalPradeshElections#AajTakExactPoll #ExitPolls@anjanaomkashyap @chitraaum pic.twitter.com/z6JVlBhnAk
— AajTak (@aajtak) December 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)