Hemant Soren To Return as Jharkhand CM: झारखंडमध्ये पुन्हा सत्ता परिवर्तनाची तयारी सुरू झाली आहे. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत हेमंत सोरेन यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. चंपाई सोरेन समन्वय समितीच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ शकतात, असे बोलले जात आहे. आता हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री होणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्री चंपाई सोरेन आजच राज्यपालांकडे राजीनामा सादर करणार आहेत. त्यानंतर हेमंत सोरेन राज्यपालांकडे शपथविधीसाठी वेळ मागणार आहेत. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन सध्या चेन्नईत आहेत. ते आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रांचीला परत येऊ शकतात. हेमंत सोरेन यांनी शपथ घेतल्यास, ते झारखंड राज्याचे 13 वे मुख्यमंत्री असतील. तब्बल पाच महिन्यांनंतर हेमंत सोरेन यांची 28 जून रोजी तुरुंगातून सुटका झाली. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. 31 जानेवारीला अटक होण्यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. (हेही वाचा: Rahul Gandhi Criticizes PM Narendra Modi: नरेंद्र मोदी सत्य हटवू शकता, पुसू शकत नाहीत; भाषणातील भाग वगळल्यानंर राहुल गांधी यांचा आक्रमक पलटवार)

पहा पोस्ट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)