HC on Non Adjusting Wife: दिल्ली उच्च न्यायालयाने पत्नीच्या 'असंवेदनशील आणि न जुळवून घेण्याच्या वृत्ती'मुळे मानसिक क्रौर्याचा सामना करत असलेल्या पतीच्या बाजूने घटस्फोट घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मेलेल्या घोड्याला चाबकाने फटके मारून काही अर्थपूर्ण हेतू साध्य होणार नाही, अशीही टिपण्णी केली. मंगळवारी जारी केलेल्या निकालात, न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने पतीच्या याचिकेवर घटस्फोट नाकारणारा कौटुंबिक न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवला आणि त्याच्या अपीलला परवानगी दिली. न्यायालयाने म्हटले की, ‘व्यक्तीला प्रभावित करणारे अयोग्य आणि निंदनीय वर्तन हे मानसिक क्रूरतेचे प्रमाण असू शकते. पती-पत्नीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य विचारात घेतले पाहिजे.’
अहवालानुसार, या जोडप्याने 2001 मध्ये लग्न केले आणि 16 वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले. वकील रवी बिरबल यांनी प्रतिनिधीत्व केलेल्या पतीने पत्नीवर क्रूरतेचा आरोप केला, तर पत्नीने दावा केला की सासरच्या लोकांनी तिच्याकडे हुंडा मागितला. या प्रकणात न्यायालयाने म्हटले आहे की, ‘पक्षांनी एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, 16 वर्षांहून अधिक काळ टिकून राहिल्यानंतरही, त्यांच्या नात्यात सतत मतभेद आणि अस्वस्थता होती. यामुळे त्यांचे नातेसंबंध बिघडत गेले. या ठिकाणी प्रतिवादी/पत्नीची न जुळवून घेण्याची वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. मतभेद सोडवण्याची परिपक्वता तिच्यामध्ये नाही. यामुळे अपीलकर्त्याला/पतीला मानसिक क्रोर्याचा सामना करावा लागला.’ (हेही वाचा: HC on Live In Relation: 'पाश्चात्य देशांप्रमाणे भारतात लिव्ह-इन रिलेशन सामान्य नाहीत, लोकांनी भारतातील संस्कृतीचा आदर केला पाहिजे'- Allahabad High Court)
Delhi High Court Grants Divorce To Man From 'Non Adjusting Wife' On Grounds Of Cruelty | @nupur_0111https://t.co/0GmVoyKY1k
— Live Law (@LiveLawIndia) January 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)