एका निर्णयामध्ये नुकतेच केरळ उच्च न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असणारी महिला देखील कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा (डीव्ही कायदा) अंतर्गत, आपल्या पार्टनरविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल करू शकते. न्यायमूर्ती अनिल के नरेंद्रन आणि पीजी अजितकुमार यांच्या खंडपीठाने नमूद केले की, लिव्ह इन रिलेशनमध्ये असलेल्या पुरुषाकडून कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडणारी महिला डीव्ही कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करू शकते. भारतीय राज्यघटनेनुसार हमी दिलेल्या, महिलांच्या अधिकारांचे अधिक प्रभावी संरक्षण करण्यासाठी डीव्ही कायदा लागू करण्यात आला आहे. (हेही वाचा: लैंगिक गुन्ह्यांमध्ये पीडितेच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा नाहीत, म्हणजे लैंगिक अत्याचार झाले नाहीत असे मानता येणार नाही- Delhi High Court)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)