दिल्ली उच्च न्यायालयाने एका जोडप्याला दिलेला घटस्फोट कायम ठेवताना निर्णय दिला आहे की, पती-पत्नीने जाणूनबुजून लैंगिक संबंधास नकार देणे ही क्रूरता आहे. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेल्या घटस्फोटाच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे. या जोडप्याचे लग्न केवळ 35 दिवस टिकले. न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने घटस्फोट मंजूर करण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पत्नीचे अपील फेटाळून लावले. उच्च न्यायालयाने या प्रकरणात निर्णय दिला आहे की. ‘शारीरिक संबंधाशिवाय विवाह हा शाप आहे आणि लैंगिक निराशा ही विवाहासाठी अत्यंत हानीकारक स्थिती आहे.’ या जोडप्याने 2004 मध्ये हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केले, मात्र पत्नी त्यानंतर लगेच तिच्या पालकांच्या घरी गेली व परत पतीकडे आली नाही. पतीने नंतर क्रूरता आणि त्यागाच्या कारणावरून घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली. (हेही वाचा: Delhi High Court: घटस्फोटित मुलीचा वडिलांच्या संपत्तीवर हक्क नाही; दिल्ली उच्च न्यायालयाची महिलेची याचिका फेटाळताना टिपण्णी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)