राहुल गांधी यांना 'मोदी' आडनावावरून केलेल्या वक्तव्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. त्यांच्या विरूद्ध मानहानीचा दावा करण्यात आला होता. यामध्ये त्यांनी खासदारकी गमावली आहे. पण या निकालाविरूद्ध कोर्टात त्यांनी धाव घेतली होती. पण शिक्षा माफीचा त्यांचा अर्ज सत्र न्यायालयाप्रमाणे आता गुजरात उच्च न्यायालयाने देखील फेटाळला आहे.  त्यामुळे त्यांना यंदाच्या संसदेच्या सत्रातही सहभागी होता येणार नाही. दरम्यान त्यांनी खासदारकीमुळे मिळालेले निवासस्थान यापूर्वीच रिकामे केले आहे. राहुल गांधी आता न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचण्याची शक्यता आहे. सध्या कॉंंग्रेस कार्यकर्ते न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध घोषणाबाजी करताना दिसत आहेत.  नक्की वाचा: Himnat Biswa Sarma on Rahul Gandhi: Adani सोबत राहुल गांधींनी 5 माजी कॉंग्रेसच्या नेत्यांना जोडत केलेल्या ट्वीट वर पहा Himnat Biswa Sarma, Anil Antony यांनी केलेला पलटवार .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)